खुपिरेच्या दत्त सेवा संस्थेवर पुन्हा सत्तारूढ गटाचा झेंडा; विरोधकांचा धुव्वा

      

दोनवडे : करवीर तालुक्यातील खुपीरे येथील दत विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत सत्तारूढ कै. तुकाराम द. पाटील दत्त सतारूढ पँनेलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकत विरोधी परिवर्तन पँनेलचा पूर्ण धुव्वा उडवला.

खुपिरेच्या दत्त सेवा संस्थेसाठी प्रचंड चुरस निर्माण झाल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले होते. सत्तारूढ गटाचे नेतृत्व आनंदा कष्णा पाटील व आकाराम पाटील यांनी केले. तर विरोधी परिवर्तन पँनेलचे नेतृत्व संजय डी. पाटील, के. डी पाटील व एस.पी.पाटील यानी  केले. स्थापनेनंतर पहिल्यांदाच या संस्थेच्या निवडणूक झाली. चुरशीने झालेल्या या निवडणुकीत सत्तारूढ गटाच्या कै. तुकाराम द. पाटील दत्त पँनेलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकल्या. निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी गटाच्या समर्थकांनी गुलालाची उधळण केली.

सतारूढ पँनेलचे विजयी उमेदवार असे : सर्वसाधारण गट – हिंदुराव चंद्रापा जांभळे,, आनंदा कोंडी पाटील,  आनंदा कृष्णा पाटील,  आंनंदा दतू पाटील, जोतीराम नरसू पाटील, ,दतात्रय तुकाराम पाटील,  लक्ष्मण बाळू पाटील, शिवाजी ज्ञानदेव पाटील, सदाशिव धोंडीराम पाटील, संजय गणपती पाटील,  महिला गट- पार्वती निवृत्ती पाटील,, साऊबाई भिकाजी बंगे,, इतर मागास गट- संभाजी दादू शिंदे, अनुसूचित जाती गट – पुंडलिक रामचंद्र कांबळे, भटक्या जाती जमाती गट – उत्तम नायकू काटकर.