कोल्हापूर उत्तरच्या पहिल्या फेरीत जयश्री जाधव आघाडीवर

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या मतमोजणीस आज राजाराम तलावाशेजारील गोदामात प्रारंभ झाला आहे. पहिल्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे.

फेरी १

फेरीतील झालेले मतदान: 7781
समाविष्ट भाग: कसबा बावडा

१) जयश्री जाधव – 4856
२) सत्यजित कदम – 2719

या फेरीतील लीड: – 2719
फेरी अखेर एकूण लीड:– 2719
मोजलेली मते: 7781
मोजायची मते: 1,70,761