संभाजीराजे ३ मे नंतर राजकीय दिशा बदलणार

कोल्हापूर : मी राष्ट्रपतीनियुक्त खासदार असल्याने मी गेल्या सहा वर्षात कोणाचाही प्रचार केलेला नाही. मात्र आता राजकीय बोलणार नाही, पण ३ मे नंतर राजकीय बोलू, असा सूचक इशारा, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी आज सकाळी खासदार संभाजीराजे न्यू पॅलेसजवळील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी ते पत्रकाराशी बोलत होते. मालोजीराजे कॉंग्रेसचा प्रचार करत आहेत आपली भूमिका काय यावर प्रश्न विचारला असता संभाजीराजे म्हणाले, मालोजीराजे हे माझे छोटे बंधू  असले तरी ते काँग्रेसचे सदस्य आहेत. मी राष्ट्रपतीनियुक्त खासदार असल्याने गेल्या सहा वर्षात कोणाचाही प्रचार केलेला नाही. मात्र ३ मे नंतर राजकीय बोलू, असा सूचक इशारा देतानाच मोठा राजकीय निर्णय घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

  संभाजीराजे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाचा शब्द पूर्ण करेल, असा मला विश्वास आहे. यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे.