शिवशक्ती प्रतिष्ठानकडून ज्योतिबा डोंगरावरील प्राचीन बारवाची स्वच्छता

कोल्हापूर : येथील शिवशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने ज्योतिबा डोंगर येथे बारव स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत जोतिबा डोंगरावर सुरुवातीसच असणारी प्राचीन अशी बारव ( विहीर ) व तिच्या भोवतीचा परिसर स्वच्छता मोहीम राबवून उजेडात आणण्यात आला.

बारव गेली काही वर्ष झाली झाडी झुडपे , वेली यामध्ये दडली गेली होती तसेच या बारवच्या पायऱ्यांचा मार्ग हा पूर्णपणे माती पालापाचोळा व कचरा याने मुजला होता. शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने सदस्यांनी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत या वेळेत या बारवची ( विहिरीची ) स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये बारवच्या आजूबाजूने वाढलेली झाडी झुडपे काढून टाकली तसेच पायरी मार्गावर साठलेला सर्व पालापाचोळा , कचरा व माती हे देखिल काढून टाकून स्वच्छता करण्यात आली. पुढील उर्वरित मोहिमेमध्ये झाडांच्या खोडांची मुळे नष्ट करून व विहिरीतील गाळ काढून विहीर स्वच्छ करून पिण्यायोग्य पाणी साठवणूक होईल अशी करण्यात येईल. अशा प्रकारे शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने बारव स्वछता मोहीम पूर्ण करण्यात आली.

या मोहिमेत शिवशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष – साताप्पा कडव,, विशाल चव्हाण, , संदीप पाडळकर,  तुकाराम खराडे, , प्रशांत पाटील, , प्रवीण कुरणे,  प्रफुल्ल भालेकर,, श्रीधर बावडेकर,, रुपेश जाधव, , जयेश चव्हाण, ,सागर पाटील,, अक्षय वरेकर , आदीनी सहभाग घेऊन कार्य केले. 

🤙 9921334545