कोल्हापूर उत्तरसाठी चुरशीने मतदान सुरु

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळपासून शांततेत मतदानास प्रारंभ झाला. दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने सकाळपासूनच नागरिक मतदानासाठी बाहेर पडत होते. राजकिय पक्षांचे कार्यकर्तेही मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत २०.५७ टक्के मतदान झाले.

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम यांच्यात काटा लढत होत असली तरी पालकमंत्री सतेज पाटील व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोघांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने जोरदार चुरस निर्माण झाली आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी उन्हाचा तडाखा वाढणार असल्याने असल्याने सकाळपासूनच नागरिकांच्या मतदान केंद्रावर रंग लागल्या होत्या.

🤙 9921334545