शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

इस्लामाबाद : माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी नॅशनल असेंब्लीचा राजीनामा दिल्यानंतर आणि पंतप्रधानपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे.

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत शाहबाज शरीफ हे आघाडीवर होते आणि आता त्यांची पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. आज रात्री आठच्या सुमारास ते या पदाची शपथ घेणार आहेत. माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना त्यांच्या विरोधात उभे केले होते, परंतु त्यांनीही पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि नॅशनल असेंब्लीचा राजीनामा दिला. ते शर्यतीतून बाहेर पडल्याने शरीफ यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तानमध्ये नव्या पंतप्रधानपदासाठी झालेल्या मतदानात शाहबाज यांनी कुरेशी यांचा १७४ मतांनी पराभव केला. मतदानापूर्वीच इम्रान खान यांच्या पक्षाने सभागृहावर बहिष्कार टाकला. 
🤙 9921334545