गुणरत्न सदावर्तेंचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला

मुंबई: गुणरत्न सदावर्तेना १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी न्यायालयानं महत्त्वपूर्ण सुनावणी देत सदावर्तेच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ केली आहे. यामुळे सदावतेंचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

सदावर्तेंना 11 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलिसांनी केली होती.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर १०९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

गुणरत्न सदावर्तेंच्या घरी रविवारी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झालं होतं. त्यावेळी त्यांच्या घराची झडती घेण्यात आल्याची माहिती आहे. या ठिकाणचे सीसीटीव्ही, रजिस्टर तपासण्यात आले असून सदावर्तेंना भेटायला कोण-कोण आलं होतं याची माहिती घेण्याचं काम पोलीस करत आहेत. ही झडती सुमारे सात ते आठ तासांपासून सुरू असल्याचं सांगितलं जातंय. एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं होतं. पवारांच्या घराच्या परिसरात प्रवेश शिरले आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी सुरु केली. काही आंदोलकांनी निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचं समोर आलं.  

🤙 9921334545