शरद पवार मोदींच्या भेटीला, चर्चांना उधाण !



नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात झालेल्या या भेटीत दोघांमध्ये २० ते २५ मिनिटे चर्चा झाली. या भेटीला सध्या राज्यात सध्या सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या गोंधळाचा किंवा संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईचा संदर्भ होता का, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.


राष्ट्रवादीचे दोन मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई केल्यापासून राज्यात महविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सध्या ‘इडी’अस्त्राची धास्ती पसरली आहे. भाजप नेत्यांकडून सातत्याने इडीचा होणारा उल्लेख आणि इडीची सक्रीयता या गोष्टींवरुन राज्यात प्रचंड गोंधळ सुरू आहे.

त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांची मोदींशी भेट होत आहे का, याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या भेटीबाबत बोलताना राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कटूता नसल्याचे म्हटले आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे सांगितले आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, त्यामुळे राज्यात राजकीय धुरळा उडाला आहे.

🤙 9921334545