बहिरेश्वरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : सांगरुळ शिक्षण संस्थेच्या बहिरेश्वर येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन शाळेचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचा सौ. अनुताई आसगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मुख्याध्यापक ए. एस. गुरव होते.

न्यू इंग्लिश स्कूल या शाळेचे माजी गुणवंत विदयार्थी विकास बचाटे (बॅंक ऑफ इंडिया ज्यूनिअर असोसिएटपदी निवड),

काजल काशीद (महाराष्ट्र पोलीस पदी), ॠषिकेश दिंडे ( III साठी मद्रास येथे निवड), प्रतीक वाडेकर यांने गेट क्वाॅलिफाईड केल्यामुळे तर रविंद्र बचाटे यांनी काॅम्प्युटर सायन्स मध्ये पी. एचडी. प्राप्त केल्याबद्दल त्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी मुख्याध्यापक गुरव सर यांनी शालेय शिक्षण अवस्थेविषयी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांनी आपले  उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी आपल्यामधील मानसिक व शारीरिक बदलांमध्ये योग्य समतोल साधणे गरजेचे आहे, असे सांगितले.

यावेळी सौ. अनुताई आसगावकर यांनी मोबाइलच्या अतिवापरामुळे त्याचे  दुष्परिणाम जास्त होत असल्याचे सांगून इंटरनेट, मोबाईल आदीचा वापर गरजेपुरताच करावा असे आवाहन केले.

 एस. के. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. के.बी. पाटील यांनी सूत्रसंचालन  केले. एकनाथ चौगले यांनी आभार मानले.

🤙 9921334545