सत्यजित कदम यांना विजयी करण्याचा निर्धार; मंगळवार पेठेत पदयात्रा

कोल्हापूर : कोल्हापूर शहराचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला. मंगळवार पेठेमधील पदयात्रेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

कोल्हापूर शहराचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. पंचगंगा नदी आणि तलाव प्रदुषणाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. महापुरामुळे कोल्हापूर शहराचे अतोनात नुकसान होत आहे. अशावेळी गेली १५ वर्षे महापालिकेत धडाडीने काम करणार्‍या सत्यजीतनाना कदम यांना विधानसभेत पाठवावे, असे आवाहन करण्यात आले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार नाना कदम यांच्या प्रचारासाठी आज सकाळी मंगळवार पेठ परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

मिरजकर तिकटी, कोळेकर तिकटी, डाकवे गल्ली, सणगर गल्ली, दैवज्ञ बोर्डींग परिसर, पद्माराजे हायस्कुल, महादेव गवंडी तालीम, जरग गल्ली, बजापराव माने तालीम मंडळ या परिसरात पदयात्रा काढण्यात आली.

या पदयात्रेद्वारे भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, कृष्णराज महाडिक, सत्यजित कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी, घरोघरी मतदारांशी संवाद साधला. सत्यजित कदम यांनी महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करताना, सत्ताधारी महाविकास आघाडीने केलेला भ्रष्टाचार आणि अनेक घोटाळे उघडकीस आणले. प्रभागातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. महापूर आणि कोरोनाच्या संकटात जनतेला तळमळीने मदत केली. एक अभ्यासू आणि विनयशिल व्यक्तीमत्व असलेल्या सत्यजित कदम यांना आता आमदार करून, कोल्हापूरचे प्रश्‍न सोडवण्यासाठी संधी दयावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी महिलांनी नाना कदम यांचे औक्षण करून, विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

या पदयात्रेत भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत, संगीता खाडे, माजी नगरसेवक विजय सुर्यवंशी, विजयसिंह खाडे-पाटील, किरण नकाते, संग्राम निकम, गणेश देसाई, विशाल शिराळकर यांच्यासह महिला आणि कार्यकर्ते सहभागी झाले होेते.

🤙 8080365706