गडहिंग्लज: गडहिंग्लज येथील शिवसेनेच्या वतीने मराठी दिनाचे औचित्य साधून आज सकाळी लक्ष्मी मंदिरापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी ग्रंथ दिंडी व शोभायात्रा मोठ्या दिमाखात व उत्साही वातावरणात काढण्यात आली.
शिवसेना शहर प्रमुख संतोष चिकोडी प्रतीक क्षीरसागर उपजिल्हाप्रमुख युवा सेना व उप तालुका प्रमुख भरत जाधवसंभाजी येदुरकर दिनेश कुंबी रकरमहानंदा चिकोडे वनिता जाधवअवधूत पाटील किशोरी शेवाळे सुशील विभुते अशोक खोत विरुपाक्ष गु ळणा वर प्रकाश कदम महंमद मुल्ला विकास जाधव मंथन डाँग यांच्यासह स्त्री-पुरुष आबालवृद्ध या शोभायात्रेत सहभागी झाले होते.