नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला तेव्हा एका मुद्द्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो म्हणजे डिजिटल करन्सी किंवा क्रिप्टो करन्सीवर सरकारने लादलेला नवा कर! आता भारतात डिजिटल चलनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के कर आकारला जाईल.
उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने डिजिटल चलनात 100 रुपये गुंतवले आणि त्याला 10 परतावा रुपये मिळाला, तर त्या 10 रुपयांपैकी 3 रुपये सरकारला कर म्हणून भरावे लागतील.व्यवहारावर TDS याशिवाय डिजिटल चलनाच्या प्रत्येक व्यवहारावर एक टक्का टीडीएस सरकारला स्वतंत्रपणे द्यावा लागेल. समजा, एखाद्या व्यक्तीने डिजिटल चलनात गुंतवणूक केली. ही गुंतवणूक त्याची संपत्ती आहे. आता जर या व्यक्तीने ही मालमत्ता दुसर्या कोणाला हस्तांतरित केली. तर त्याला त्या मालमत्तेच्या एकूण मूल्यावर 1% दराने स्वतंत्रपणे TDS भरावा लागेल. दरमहा तुम्हाला मिळणाऱ्या पगारावर सरकार जो कर घेते, तसाच तो टीडीएस आहे. सरकार डिजिटल चलनाला एक उत्पन्नाचा स्रोत मानत आहे आणि त्याच्या कमाईवर 30 टक्के करही लावण्यात आला आहे.