दोनवडे : खुपिरे (ता. करवीर) येथील श्री दत्त सहकार समूहाचे प्रमुख आणि कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तुकाराम दत्तात्रय पाटील (बापू) वय ७८ यांचे रविवारी निधन झाले.
किरकोळ उपचार सुरू असताना रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. बापू यांची काही महिन्यांपूर्वीच पंचाहत्तरी साजरी करण्यात आली होती.
सांगरुळ शिक्षण संस्थेचे शिक्षक आकाराम पाटील व कामगार प्रतिनिधी सखाराम पाटील यांचे ते चुलते होत. रविवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून काढण्यात आली. अंत्ययात्रेत आ. पी. एन. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, पाच मुली, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.