कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोल्हापूर यांच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या दिनानिमित्त गुरुवार दि ६ रोजी पत्रकारांना पारस्कर देऊन सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती शहराध्यक्ष प्रशांत चुयेकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे .
यावेळी दैनिक पुढारीचे विकास कांबळे, सकाळचे डॅनिअल काळे, लोकमतचे तानाजी पोवार, तरुण भारतचे विठ्ठल बिरंजे ,पुण्यनगरीचे चंद्रकांत पाटील जनप्रवासाचे संपत नरके, बी न्युजचे रवी कुलकर्णी , एस न्युजचे संगम कांबळे पुढारी ऑनलाइनच्या स्नेहा मांगुरकर, स्पीड न्यूजचे दिनेश चोरगे यांच्यासह आणि दैनिक पुढारीचे सहायक वितरक व्यवस्थापक अमर पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे .यावेळी कार्यक्रमाला आमदार ऋतुराज पाटील आमदार प्रकाश आवाडे, जि .प .चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, डॉ रमेश पोवार, भीमराव संघमित्रा, डॉ स्मिता गिरी उपस्थित राहणार आहेत .