अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात बसवल्या जाणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीची रविवारी निवड करण्यात आली. 29 डिसेंबर (शुक्रवार) रोजी झालेल्या बैठकीनंतर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी महासचिव चंपत राय यांना लेखी तीन पुतळ्यांबाबत आपले मत दिले होते.चंपत राय यांनी सांगितले की, गर्भगृहात रामलल्लाचा 51 इंच उंचीची मूर्ती बसवली जाईल, ज्यामध्ये रामलल्लाची 5 वर्षांची मूर्ती बसवली जाणार आहे. रामलल्लाची उभी मूर्ती गर्भगृहात बसवली जाणार आहे. ही मूर्ती राजपुत्र आणि विष्णूचा अवतार असल्याची भासते.
रामलल्ला गर्भगृहात कमळाच्या फुलावर विराजमान होणार आहेत. कमळाच्या फुलासह मूर्तीची उंची सुमारे 8 फूट असेल. या मूर्तीचा फोटो अद्याप प्रसिद्ध झालेला नाही.चंपत राय यांनी सांगितले की, गर्भगृहात रामलल्लाचा 51 इंच उंचीची मूर्ती बसवली जाईल, ज्यामध्ये रामलल्लाची 5 वर्षांची मूर्ती बसवली जाणार आहे. रामलल्लाची उभी मूर्ती गर्भगृहात बसवली जाणार आहे. ही मूर्ती राजपुत्र आणि विष्णूचा अवतार असल्याची भासते. रामलल्ला गर्भगृहात कमळाच्या फुलावर विराजमान होणार आहेत. कमळाच्या फुलासह मूर्तीची उंची सुमारे 8 फूट असेल. या मूर्तीचा फोटो अद्याप प्रसिद्ध झालेला नाही.
अयोध्येत 22 जानेवारीला प्रभु रामचंद्राची प्रतिष्ठापना, मोदींना पाठवले निमंत्रण; डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करणार
निळ्या दगडाच्या मूर्तीची निवड
सूत्रांनुसार, रामलल्लाची मूर्ती निळ्या दगडापासून बनवण्यात आली आहे. शिल्पकार योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. रामलल्लाच्या तीन मूर्ती गणेश भट्ट, योगीराज आणि सत्यनारायण पांडे या तीन शिल्पकारांनी तीन दगडांपासून बनवल्याचं सांगण्यात येत आहे.
यामध्ये सत्यनारायण पांडे यांची मूर्ती पांढऱ्या संगमरवरीवर बनवली आहे. तर उर्वरित दोन मूर्ती कर्नाटकातील निळ्या दगडाच्या आहेत. यामध्ये गणेश भट्ट यांची मूर्ती दक्षिण भारताच्या शैलीत तयार करण्यात आली होती. यासाठी अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे.
रामलल्लाचा पुतळा तयार करणारे 37 वर्षीय अरुण योगीराज म्हैसूर राजवाड्यातील कलाकारांच्या कुटुंबातून आले आहेत. त्यांनी 2008 मध्ये म्हैसूर विद्यापीठातून एमबीए केले, त्यानंतर एका खासगी कंपनीत काम केले. यानंतर त्यांनी पुतळे बनवण्यास सुरुवात केली. लहानपणापासूनच पुतळे बनवण्याकडे त्यांचा कल होता. पीएम मोदींनीही त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. योगीराजांनीच जगद्गुरू शंकराचार्यांची भव्य मूर्ती उभारली होती. त्यांनीच शंकराचार्यांची मूर्ती घडवली, जी केदारनाथमध्ये स्थापित करण्यात आली आहे.