नवी दिल्ली: खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर India-Canada कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या भारताविषयीच्या वक्तव्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.खलिस्तानच्या मुद्यावर भारतासोबतचा वाद कॅनडाला महागात पडला आहे.
भारतीय विद्यार्थ्यांनी कॅनडाला पाठ दाखवली आहे. कॅनडाचे मंत्री मार्क मिलर यांनीही नजीकच्या भविष्यात भारतातून येणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी कॅनडाला जातात.
भारतीय विद्यार्थ्यांना कॅनडाला जाण्यासाठी मिळणार्या परवान्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. अहवालानुसार, सुमारे 86 टक्के कमी भारतीय विद्यार्थ्यांना परवाने मिळाले आहेत. कॅनडाच्या एका वरिष्ठ सरकारी अधिकार्याने सांगितले की, गेल्या वर्षाच्या अखेरीस परवान्यांमध्ये मोठी घट झाली आहे. याचे कारण India-Canada भारताने परमिट प्रक्रिया पूर्ण केलेल्या कॅनडाच्या मुत्सद्यांना देशातून बाहेर काढले. खलिस्तानच्या मुद्यावरील वादाच्या दरम्यान भारताच्या कठोरतेचा परिणाम म्हणजे कॅनडामध्ये पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी अर्ज केले
गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या परवान्यांमध्ये मागील तिमाहीच्या तुलनेत 86 टक्क्यांनी घट झाली. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत 1,08,940 परवाने देण्यात आले. गेल्या तिमाहीत केवळ 14,910 विद्यार्थ्यांना परवाने देण्यात आले. ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालयातील सल्लागार सी. गुरूसुब्रमणियम् यांनी सांगितले की, कॅनेडियन संस्थांमधील वसतिगृह आणि शैक्षणिक दर्जा कमी झाल्यामुळे काही भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यार्थी इतर पर्यायांचाही विचार करत आहेत.
13.64 ट्रिलियन वार्षिक महसुलाची कमाई2022 मध्ये कॅनडाला जाणार्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 41 टक्केम्हणजेच 2,25,835 भारतीय विद्यार्थी होते. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी तेथे गेल्याने कॅनडाची आर्थिक स्थितीही मजबूत होते. अंदाजानुसार, वार्षिक उत्पन्न सुमारे 22 अब्ज कॅनेडियन डॉलर्स म्हणजे 16.4 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. भारतीय चलनात ही रक्कम 13.64 ट्रिलियन रुपये आहे.