युवा नेते संजय गोधडे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्यांचे वाटप

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : बहिरेश्वर (ता.करवीर) येथील युवा नेते संजय शामराव गोधडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत व वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. यामध्ये वही,पेन इत्यादी साहित्यांचा समावेश आहे. विद्यामंदिर बहिरेश्वर मधील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप करण्यात आले.


वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत शैक्षणिक साहित्यांचे वाटप केल्याबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर यांनी संजय गोधडे यांचे कौतुक केले. तसेच असे उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे देवकर म्हणा
दरम्यान,शाळेचे मुख्याध्यापक एस.के चौगले यांनी मान्यवरांचे स्वागत केले व आभार मानले.यावेळी पांडुरंग हवलदार,कोटेश्वर विकास सेवा संस्थेचे पाणीपुरवठा विभागाचे चेअरमन सर्जेराव काशीद, सचिव महेश माने व संजय गोधडे यांचे मित्र मंडळ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *