करवीर पश्चिम भागात ऊस तोडणीस सुरूवात

बहिरेश्वर (प्रतिनिधी): करवीर पश्चिम भागात ऊस तोडणीला सुरूवात झाली आहे. साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. जाहीर केल्यानंतर ऊस तोडणीला सुरूवात झाली.

चालू गळीत हंगामात कुंभी साखर कारखान्याने ३०४५ रु., दत्त साखर आसुर्ले पोर्ले ३१४६ रु., भोगावती साखर कारखान्याने ३००३रु. एफ.आर.पी.जाहीर केली आहे. ऊस तोड कामगारांनी गुलाल लाऊन ऊसवाहतूक करणारी वाहने कारखान्याच्या दिशेने मार्गस्थ केली. ऊस तोडणी सुरू झाल्याने जनावरांना लागणाऱ्या वैरणीचा तुटवडा भासणार नाही. याशिवाय कामधंदा सुरु झाल्याने ऊस तोड कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *