बोगस डॉक्टरकडून उपचार करून घेणं महिलेला पडलं महागात..

नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या आगर मालवा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बोगस डॉक्टरकडून उपचार करुन घेणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे.

डॉक्टरने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.महिला रुग्णावर उपचार करताना संबंधित डॉक्टरने एक इंजेक्शन दिले. त्यानंतर महिलेचा पाय आणि वरचा भाग निळा पडण्यास सुरुवात झाली. पाय जड झाल्याने वेदनाही महिलेला जाणवू लागल्या. त्यामुळे महिलेला पुन्हा डॉक्टरकडे नेण्यात आले.

डॉक्टरांनी महिलेला उज्जैन येथे पुढील उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. कुटुंबीय जेव्हा महिलेला उपचारासाठी उज्जैन येथे घेऊन जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.डॉक्टरने चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेतली असून डॉक्टरविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. तसेच चौकशीला सुरुवात केली आहे.

तनोडिया येथे राहत असलेल्या महिलेची प्रकृती बिघडल्याचे कुटुंबीयांनी तिला एका खासगी दवाखान्यात नेले होते. पण डॉक्टरनं केलेल्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबीयांनी केला असल्याचे स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिक्षक रणजीत सिंगर यांनी सांगितलं आहे. प्रथम दर्शनी माहितीनुसार तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *