देवेंद्र फडणवीसांचा राज्यसरकारला ‘हा’ टोला

नांदेड (प्रतिनिधी): महाविकासआघाडी सरकार इतकं लबाड आहे की काहीही झालं तरी ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मला तर असं वाटतंय की यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की केंद्र सरकारचा हात आहे, असे लबाड लोक इथं आहेत अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला टोला लगावला. नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी इथं देगलूर पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याची पुरेशी रक्कम मिळालेली नाही. राज्य सरकार स्वतः भ्रष्टाचार करत आहे आणि मदत द्यायची वेळ आली की केंद्राकडे बोट दाखवत आहे, अशा आशयाची टीका करत त्यांनी ठाकरे सरकारला जबरदस्त टोला लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *