रस्त्यांच्या दुरावस्थेस चंद्रकांत पाटील जबाबदार : ना.हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी): राज्यात भाजप सत्तेत असताना चंद्रकांत पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. हायब्रीड अन्युटी असा एक नवीन रस्ता प्रकल्प त्यांनी रस्ते तयार करण्यासाठी आणला होता. अतिशय चुकीची बेकायदेशीर योजना चंद्रकांत पाटील यांनी आणली आणि रस्त्यांचा बट्ट्याबोळ केला अशी टिका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. ते निढोरी (ता.कागल) येथे विविध विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गणपतराव फराकटे होते. यावेळी खासदार संजय मंडलिक प्रमुख उपस्थित होते.

पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले, निपाणी-देवगड रस्त्याचे काम जितेंद्र सिंग या कंपनीकडे देण्यात आले आहे. ते कोर्टात गेले तर हे काम लांबेल म्हणून अधिकारी सुद्धा त्यांना नरमाईने बोलतात.
परंतु ह्या आठ दिवसात मी आणि खासदार संजय मंडलिक त्यांना बोलावून जर हा रस्ता करणार नसतील तर त्याला हे काम सोडायला लावण्यासाठी डोक्यावर उभे केल्याशिवाय सोडणार नाही. हा रस्ता लवकरच पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. या राज्यातील अनेक रस्ते बंद पडलेले आहेत. ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासनही दिले.

यावेळी अतुल जोशी, देवानंद पाटील, विकास सावंत यांची भाषणे झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील, कागलच्या नगराध्यक्ष माणिक माळी, भैय्या माने, युवराज बापु पाटील, केशवराव पाटील, विकास पाटील कुरुकलीकर, बी. एम. पाटील, डी. एम. चौगले, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, जयश्री पाटील, आश्विनी पाटील, शशिकांत पाटील यांच्यासह मान्यवर हजर होते.स्वागत उपसरपंच सविता चौगले यांनी तर प्रास्ताविक सरपंच अमित पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *