गांधीनगर येथे मालवाहतुकीची वेळ वाढवून द्या; करवीर शिवसेनेची मागणी

गांधीनगर (प्रतिनिधी) : दिपावलीनिमित्त गांधीनगर येथे मालवाहतुकीसाठी घालून देण्यात आलेल्या वेळेत बदल करण्यात यावा अशी मागणी करवीर शिवसेनेच्यावतीने गांधीनगरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले यांच्याकडे करण्यात आली आहे.

गांधीनगर येथे दिपावलीनिमित्त जास्त गर्दी होत असल्याने मालवाहतूक टेम्पो रिक्षाला रात्री १० ते दुपारी ०१ पर्यंत वाहतुकीस वेळ दिली आहे. परंतु, या वेळेत संपूर्ण मालवाहतूक होत नसल्याने ही वेळ वाढवून द्यावी अशी मागणी करवीर शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

यामुळे मालवाहतूक रिक्षावाल्यांवर अन्याय होणार असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. गांधीनगर बाजार पेठेतील दुकाने सकाळी ११ ते १२ या दरम्यान वाजता उघडतात. त्यानंतर रिक्षावाल्यांची मालवाहतूक सुरु होते. लगेच ०१ नंतर मालवाहतूक बंद झाली तर त्यांची दिवाळी कडू होणार असल्याचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान,सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी रात्री १० ते दुपारी ०३ वाजेपर्यंत मालवाहतूक रिक्षा वाहतूक करण्यास परवानगी दिली.यावेळी विभागप्रमुख वीरेंद्र भोपळे, दत्तात्रय मोहिते, शिवाजी लोहार, भगवान माळी, रवी पंढरे, अर्जुन यादव, बाजीराव आंबी, रफिक मुल्ला, दिलीप खांडेकर, कृष्णात यादव सह मालवाहतूक रिक्षावाले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *