बांधकाम कामगारांच्या समस्या सोडवू : ना.हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी): बांधकाम कामगारांच्या सर्वच समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही ग्रामविकास कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

कोल्हापुरात कोल्हापूर जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी बांधकाम कामगारांच्या समस्याचे निवेदनही पदाधिकाऱ्यांनी ना.मुश्रीफ यांना दिले.

या निवेदनात बांधकाम कामगारांना  दिवाळी बोनस दहा हजार रुपये द्या या मागणीसह,  मेडिक्लेम योजना पूर्ववत सुरु करा, घर बांधण्यासाठी साडेपाच लाखांचे अनुदान द्या, नैसर्गिक मृत्यूसाठी पाच लाख व अपघाती साठी दहा लाख रुपये द्या, शैक्षणिक मदत योजनेच्या रकमेत वाढ करा, कोविडसह गंभीर आजारासाठी एक लाख रुपये लाभ द्या, ६० वर्षावरील कामगारांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्या, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर सीटूचा प्रतिनिधी घ्या, महिला कामगारांना बाळंतपणानंतर दरमहा तीन हजार रुपये सहा महिन्यापर्यंत मिळावेत, बांधकाम कामगारांच्या मुला-मुलींच्या लग्नाकरिता एक लाख रुपये अनुदान द्या आदी प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, सिटू कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव, जिल्हा सचिव शिवाजी मगदूम, सिंधू शार्दुल, आजरा गडहिंग्लज चंदगड अध्यक्ष प्रकाश कुंभार, पन्हाळा गगनबावडा तालुका अध्यक्ष भगवानराव घोरपडे, राधानगरी तालुका अध्यक्ष संदीप सुतार, कागल तालुका अध्यक्ष विक्रम खतकर, करवीर तालुका अध्यक्ष आनंदा कराडे, भुदरगड तालुका अध्यक्ष शिवाजी मोरे, हातकणंगले तालुका अध्यक्ष बापू कांबळे, शाहुवाडी तालुका सेक्रेटरी मनोहर सुतार, शिरोळ तालुका अध्यक्ष पोपट कुरणे,  इचलकरंजी शहर नूरमोहम्मद वळकुंडे , मोहन गिरी, रामचंद्र निर्मळ, संतोष राठोड, दत्ता कांबळे , जितेंद्र ठोंबरे, कुमार कागले, दगडू कांबळे, विजय कांबळे, अरंजय पाटील, रामचंद्र नाईक, नामदेव पाटील, दत्ता गायकवाड, शिवाजी कांबळे, राजाराम आरडे, उदय निकम, अशोक सुतार, यांच्यासह पदाधिकारी व बांधकाम कामगार उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *