मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण

मुंबई (प्रतिनिधी) : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या आईंनाही कोरोनाची लागण झाली आहे. मास्क वापरणार नाही, असा पवित्रा राज ठाकरे यांनी घेतला होता.

सौम्य ताप आणि लक्षणं दिसून आल्यामुळे कोविड 19 संसर्गाची चाचणी करण्यात आली होती. त्यात राज ठाकरे यांच्या आईंची कोरोना चाचणी शुक्रवारी पॉझिटिव्ह आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या मातोश्री, मोठी बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे अशा तिघांचे कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहेत. त्यानंतर आज राज ठाकरे यांचीही चाचणी घेण्यात आली. त्यानंतर अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय लिलावती हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *