गोकुळची एका दिवसात १५ लाख १४ हजार लिटर दूध विक्री !

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ)ने आज (गुरुवारी) एका दिवसात दूध विक्रीचा नवा उच्चांक केला आहे. दिवसात पंधरा लाख १४ हजार ५७२ लिटर दूध विक्री केली आहे. यानिमित्ताने गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालामध्‍ये कर्मचाऱ्यांच्यावतीने चेअरमन विश्‍वास पाटील यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

यावेळी बोलताना चेअरमन विश्‍वास पाटील म्‍हणाले, या कौतुकास्‍पद कामगिरी बद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळ व्‍यवस्‍थापनाचे अभिनंदन केले आहे. दूध विक्रीमध्‍ये नविन मानदंड प्रस्थापित करताना गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. गोकुळने दिवसाला २० लाख लिटर्स दूध संकलन व तीतकीच विक्री करण्‍याचे उद्दिष्‍ट ठेवलेले असून हे उद्दिष्‍ट गोकुळ दूध उत्‍पादक व ग्राहकांच्‍या विश्‍वासहार्ततेवर साध्‍य करू. या यशामध्‍ये गोकुळचे दूध उत्‍पादक, दुधसंस्था ग्राहक वितरक,कर्मचारी व वाहतूक ठेकेदार यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

जेष्ठ संचालक अरुण डोंगळे बोलताना म्हणाले, भविष्यात जास्‍तीत जास्‍त म्‍हैशीच्‍या दूध उत्‍पादनाचा टप्‍पा ओलांडण्‍यासाठी गोकुळच्‍या व्‍यवस्‍थापनाने विशेष खबरदारी घेतली पाहिजे. म्‍हैस दूध उत्‍पादन वाढीसाठी दूध उत्‍पादकांना विविध प्रकारच्‍या सेवा सुविधा देण्‍यावर भर दिला पहिजे.

यावेळी संचालक बयाजी शेळके, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील वित्‍त व्‍यवस्‍थापक एच.एम.कापडिया, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ. यु. व्ही.मोगले, संकलन व्‍यवस्‍थापक एस. व्ही. तुरंबेकर, कामगार संघटनेचे शंकर पाटील, शाहीर निकम, डॉ. साळुंके, डॉ. गायकवाड, दत्‍ता वाघरे, संभाजी पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *