कोगे-बहिरेश्वर बंधाऱ्यासाठी १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर : आ.पी.एन.पाटील

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : भोगावती नदीवरील जिर्ण झालेल्या कोगे ते बहिरेश्वर दरम्यानच्या बंधाऱ्यासाठी एक कोटी वीस लाख रूपयांचा निधी मंजूर केला असून या कामाला लवकरच सुरुवात होईल अशी माहीती आमदार पी.एन.पाटील यांनी दिली. या बंधाऱ्याच्या अनुषंगाने आज कोल्हापूर येथे बोलावलेल्या बैठकीत आ.पाटील यांनी ही माहीती दिली.

हा बंधारा तात्काळ दुरुस्तीसाठी आ.पाटील यांनी कोल्हापुर पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता यांच्याकडे १ जुन रोजी पत्राद्वारे मागणी केली. तसेच जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांना भेटून याबाबत चर्चा केली होती.त्यानुसार सदर बंधारा दुरूस्तीसाठी १ कोटी २० लाख निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया पुर्ण होवून लवकरच कामास सुरवात होणार आहे असे सांगून या बंधाऱ्यावर जवळपास १५ गावांना पिण्याचे पाणी व सिंचनाचे अंदाजे १८००  हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. त्या सर्वांची अडचण दूर होणार आहे असे आ.पाटील यांनी सांगितले.

या बैठकीला गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, जिल्हा परीषद सदस्य सुभाष सातपुते, उपविभागीय अभियंता पी.जे.माने, कोगे शाखाधिकारी राकेशकुमार नाझरे, राधानगरी पाटबंधारे शाखाधिकारी समीर निरूखे, सहाय्यक अभियंता वीरेंद्र मंडलिक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *