न्यूज मराठी २४ इम्पॅक्ट; अखेर ‘तो’ बंधारा वाहतुकीस बंद

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी बहिरेश्वर-कोगे (ता.करवीर) दरम्यानच्या बंधाऱ्याच्या मध्य भागाचा एक संपूर्ण पिलरच ढासळल्याची बातमी न्यूज मराठी २४ ने दिली होती. तसेच स्थानिक प्रशासनाने व पाटबंधारे विभागाने कोणताही अनुचित प्रकार घडण्याअगोदर कोगे-बहिरेश्वरची संपूर्ण वाहतूक बंद करावी अशी मागणी होत असल्याचेही न्यूज मराठी २४ ने बातमीच्या माध्यमातून सांगितलं होत.

अखेर न्यूज मराठी २४ च्या बातमीची दखल घेत बहिरेश्वर-कोगे दरम्यानचा बंधारा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी तात्काळ बंधाऱ्यास भेट देवुन स्थानिक प्रशासनाला दोन्ही बाजुने रस्ता खुदाई करण्यास सांगितले. याशिवाय रस्ता बंदचे फलक लावण्यात आले आहेत.

आमदार पी.एन.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही निधी उपलब्ध करुन दिला आहे. याचबरोबर लवकरात लवकर धरणाचे काम सुरु करा अशा सुचना देखील पाटबंधारे विभागाला दिल्या. पाऊस थांबल्या नंतर तात्काळ काम सुरु करु व लवकरात लवकर धरण दुरुस्ती करु असं पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. पण बंधारा दुरुस्ती ऐवजी नवीनचं बांधावा व वाहतूकीचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढवा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *