माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावली ;एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ताप आल्यानंतर त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) दिल्लीत दाखल करण्यात आले आहे.एका सूत्राने सांगितले, ‘त्यांना दोन दिवसांपूर्वी ताप आला आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आज त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या मनमोहन सिंग यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे आणि काळजी करण्यासारखे काही नाही.मनमोहन सिंग यांना या वर्षी कोरोना विषाणूची लागण झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 19 एप्रिल रोजी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर 29 एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला.

माजी पंतप्रधानांनी 4 मार्च आणि 3 एप्रिल रोजी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते.मनमोहन सिंग 88 वर्षांचे आहेत आणि ते साखरेच्या आजारानेही त्रस्त आहेत. माजी पंतप्रधान सिंग यांच्यावर दोन बायपास शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. त्यांची पहिली शस्त्रक्रिया 1990 मध्ये युनायटेड किंगडममध्ये करण्यात आली. तर 2009 मध्ये त्यांची दुसरी बायपास शस्त्रक्रिया एम्समध्ये करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *