डंपर व दुचाकीच्या धडकेत पन्हाळा तालुक्यातील तरुण ठार

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शाहूपुरी येथे डंपर व दुचाकीच्या धडकेत पन्हाळा तालुक्यातील काळजवडे येथे राहणारा ओंकार दिनकर मुगडे (वय 18) हा तरुण जागीच ठार झाला. तर दुचाकीवर मागे बसलेले शिवाजी नेमणे (वय 18 )शाहूवाडी, करण पाटील( काळजवडे) पन्हाळा हे दोघे गंभीर जखमी झाले. शाहूपुरी पाचव्या गल्लीतील हा अपघात घडला. याची फिर्याद सतीश देवेकर यांनी शाहूपुरी पोलिसात दिली आहे.

फिर्यादी सतीश देवेकर हे महापालिकेच्‍या कचरा डंपरवर चालक म्‍हणून काम करतात. मंगळवारी मध्‍यरात्री एकच्‍या सुमारास ते कचर्‍याचा डंपर घेवून गोकूळ हॉटेलकडून गवत मंडईकडे निघाले होते. पटेल स्‍पेअरपार्टजवळ डंपर आला असता नाईक ॲन्‍ड नाईक कंपनीकडून पाचव्‍या गल्‍लीतून भरधाव आलेल्‍या दुचाकीने डंपरच्‍या इंधन टाकीजवळ जोराची धडक दिली. देवेकर यांनी डंपरमधून उतरुन पाहिले असता तिघे तरुण जखमी अवस्‍थेत दिसले. त्‍यांनी जखमींना अग्‍मिशमन वाहनाच्‍या मदतीने तत्‍काळ उपचारासाठी सीपीआरमध्‍ये आणले. ओंकार मुगडेच्या डोक्‍याला, छातीला गंभीर दुखापत झाल्‍याने अंतर्गत रक्‍तस्‍त्राव होवून त्‍याचा उपचारापुर्वीच मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

कामे आटोपून घरी जाताना अपघातमृत ओंकार मुगडे, जखमी शिवाजी व करण हे तिघेही पन्‍हाळा व शाहूवाडी तालुक्‍यातील आहेत. त्‍यांच्‍या गावातील एकाचे शहरात हॉटेल असून तिघेही तिथे काम करत होते. नवरात्रीनिमित्त देवदर्शन व दांडीया पाहण्‍याचे ठरवून तिघे हॉटेलवरुन निघले. शहरात फेरफटका मारुन तिघेही गावी जाणार होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *