अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये : शरद पवार

मुंबई : गेल्या सहा दिवसांपासून आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू आहे. आयकर विभागाकडून सुरू असलेल्या या कारवाईवर शरद पवारांना विचारले असता त्यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये शरद पवारांनी म्हटलं, असे पाहुणे येतात… एक-दोन-तीन दिवस राहतात पण आजचा सहावा दिवस आहे.पाहुण्यांनी इतकं राहू नये. अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये.

अजित पवारांच्या बहिणींच्या घरावर छापेमारी करण्यात आली त्या साखर कारखान्याशी संबंधित नाहीत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव ? आम्हाला जायचं आहे पण आम्हाला सूचना आहेत की, सांगितल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही असं आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटल्याचं शरद पवारांनी सांगितलं.शरद पवारांनी केलेल्या या विधानामुळे आता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनिल देशमुखांच्या विरोधात तत्कालीन मुंबई पोलीस कमिश्नर यांनी काही आरोप केले, त्यावर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला. अनिल देशमुख यांच्यावर ज्यांनी आरोप केले त्यांचा आज पत्ता नाही. अनिल देशमुख हे तातडीने बाजूला झाले आणि हे अधिकारी गायब झाले. अनिल देशमुख यांच्या घरी 5 वेळा छापा टाकला.5-5 वेळेला एखाद्याच्या घरी छापा टाकण कितपत योग्य आहे. याबाबत जनमत व्यक्त होणं गरजेचं आहे. 5-5 वेळा छापा टाकून काय मिळालं? अनिल देशमुखांवर आरोप करणारे आज कुठे आहेत? असे सवालही शरद वापारांनी उपस्थित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *