कबनूर येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन महिला गंभीर जखमी

इचलकरंजी : इचलकरंजी कबनूर दत्तनगर( गल्ली नंबर 11 ) येथील अंगणवाडी सेविका कांचन स्वामी यांच्या घरी सकाळी घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी सांगलीला नेण्यात आले आहे. त्या अथणी यांच्या घरी भाड्याने राहत होत्या.

सदर महिला सकाळी फिरण्यासाठी जाऊन आल्या अंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गॅस चालू करत असताना मोठा स्फोट झाला. यामध्ये त्या साठ टक्के भाजला गेल्या. त्यांना सांगली हॉस्पिटलला नेण्यात आले.

स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की घराचे सर्व पत्रे फुटुले आहेत. फुटलेली पत्रे व छत शेजारच्या घरावर उडून पडले आहेत. प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जखमी कांचन स्वामी या अंगणवाडी सेविका म्हणून काम पाहतात.त्या सकाळी घरी एकटीच होत्या. त्यांचा मुलगा आजोळी मामाच्या गावी होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *