भाजपामध्ये आलो, आता शांत झोप लागते

मुंबई (वृत्तसंस्था) : मला विचारणा झाली की तुम्ही भाजपामध्ये का गेलात? त्यावर मी त्यांना म्हटलं ते तुमच्या नेत्यालाच विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपामध्ये का गेले. पण मी सांगतो, इथे मस्त निवांत आहे. भाजपामध्ये आल्यामुळे शांत झोप लागते. चौकशी नाही, काही नाही. मस्त वाटतंय, असं भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजपा नेते म्हणूनच हर्षवर्धन पाटील हे एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. मात्र, पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे नवीच चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे. या विधानामुळे विरोधकांना आयतंच कोलीत मिळाल्याचं बोललं जात आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी राज्यातल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपामध्ये झालेल्या मेगाभरतीदरम्यान काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला.

हर्षवर्धन पाटील यांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.  “हर्षवर्धन पाटील यांचं स्टेटमेंट वाचलं. ते कधीकाळी काँग्रेसचे नेते होते. आज ते भाजपामध्ये आहेत. ते म्हणाले की भाजपामध्ये गेलं की शांत झोप लागते. चौकशीचा ससेमिरा मागे लागत नाही. या त्यांच्या एका वाक्यात सगळं सामावलेलं आहे”, असं राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *