संभाजीराजेंचा पुन्हा एल्गार; ‘या’ तारखेपासून पुन्हा राज्यभर दौरा

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने दिलेली आश्वासने पाळली गेली नाहीत. त्यामुळे आता चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणत खासदार संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा राज्यभर दौरा काढण्याचं जाहीर केलं आहे. 

खासदार संभाजीराजे म्हणाले, मला सरकारला पुन्हा एकदा सांगायचं आहे. मी पुन्हा मराठा समाजाच्या समन्वयकांसोबत पुन्हा एकदा राज्याचा दौरा करत आहे. २५ ऑक्टोबर नंतर हा दौरा सुरू होईल. दौऱ्याची सुरुवात रायगड पासून सोलापूर, उस्मानाबाद, अहमदगनरचा दौरा आधी करणार आहोत.

आम्ही गेल्या काही महिन्यांपासून शांत बसलो आहोत. काहीही ठोस निर्णय झालेला नाहीये. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं त्यानंतर मी नांदेड येथील दौऱ्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. त्यावर सुद्धा काहीही भाष्य नाही. कुठलीही चर्चा नाही. केवळ कोविडचं कारण सांगत पुढे ढकलायचं त्यामुळेच पुन्हा आमचा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *