मणिपूरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा बिमोड करण्याकरता राष्ट्रीय तपास यंत्रणेनं ९०० लोकांना ताब्यात घेण्याची मोठी कारवाई केली असतानाच ईशान्येकडे कुकी अतिरेक्यांनी मोठा हल्ला करत सरकारला आव्हान दिलं आहे.

टाईम्स नाऊ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यातील बी गॅमनोम गावात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दोन अतिरेक्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी जमलेल्या ग्रामस्थांवर कुकी अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार  केला. यात ५ जण मरण पावले. या हिंसाचारामुळे या भागात तणाव निर्माण झाला असून, गावकरी घाबरले आहेत. अनेक गावकरी गाव सोडून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत.

या गोळीबारात ठार झालेल्या तीन लोकांचे मृतदेह हाती लागले असून, उर्वरीत दोन मृतदेह अद्याप हाती आलेले नाहीत. हल्लेखोरांना पकडण्यासाठी राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली असल्याची माहिती आयजी ल्युसेह किप्गेन  यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *