कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; कस्तुरी सावेकरने केले सगळ्यात अवघड शिखर सर

कोल्हापूर : अतिशय लहान वयात जगातील सगळ्यात अवघड असणारे माऊंट मनस्लू शिखर सर करून कोल्हापूरची गिर्यारोहक कस्तुरी सावेकर कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.कोल्हापुरातील छत्रपती ताराराणी पुतळा येथे बुधवारी तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

कोल्हापूर येथे आल्यानंतर तिचे स्वागत तुतारीचा निनाद आणि टाळ्यांच्या कडकडाटात करण्यात आले. कोल्हापूरकरांनी पुष्पगुच्छ देऊन छत्रपती ताराराणी यांच्या साक्षीने तिचे स्वागत व तिला शुभेच्छा दिल्या.

छत्रपती ताराराणी यांना वंदन करून फुलांनी सजवलेल्या जीपमधून कस्तुरी दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज पुतळा यांना अभिवादन करण्यासाठी निघाली. कोल्हापूर महानगर पालिकेच्या उपायुक्त दरेकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

यावेळी डॉ. अमर अडके यांनी मोहिमेची माहिती दिली. दुर्ग अभ्यासक प्रशांत साळुखें यांनी प्रास्ताविक केले. तसेच, पंडीत पोवार, हेमंत साळोखे, अरविंद कुलकर्णी, डॉ जे. एफ. पाटील, उद्योजक प्रसाद कामत, उमेश पोवार, शिवसेना शहर प्रमुख जयवंत हारूगले यांनी कस्तुरीला शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस आशिर्वाद दिले. या कार्यक्रमास करवीर हायकर्सचे संतोष कांबळे, उमेश कोडोलीकर, तेजस सावेकर, विक्रम कुलकर्णी, अनिल भोसले, आनंदा डाकरे, विजय मोरे, उदय निचिते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *