एनसीसी शिबिरात भाग घेतल्याने कोणतेही ध्येय लवकर गाठता येईल : ब्रिगेडियर समीर साळुंखे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ): छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील पिढ्यानपिढ्या चालत आलेली राष्ट्रप्रेमी परंपरा देश सेवेकरिता नेहमी आत्मप्रेरणा देत असतात.असे प्रतिपादन कोल्हापूर ग्रुप एनसीसीचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर समीर साळुंखे यांनी केले. ते कोल्हापूर ग्रुप येथे आयोजित एनसीसीच्या वार्षिक शिबिरामध्ये विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते

दहा दिवसांच्या वार्षिक शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या ड्रील, फायरिंग, गार्ड ऑफ हॉनर , बेस्ट कैडेट आदी स्पर्धा पार पडल्या. त्याचबरोबर एनसीसी कॅडेट यांनी यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.यावेळी एनसीसीचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर समीर साळुंखे पुढे म्हणाले, एकता आणि अनुशासन हे जीवनात उतरविण्यास एनसीसीची शिबिरे आवश्यक आहेत.

शिबिरात सहभाग घेतल्याने कोणतेही ध्येय कमी वेळेत साधता येते.महाविद्यालयीन अभ्यासक्रमास सोबत राष्ट्रीय छात्र सेनेतील सहभाग आपणास देशसेवेचे आवश्यक असणारे बालकडू तर देतेच शिवाय व्यावहारिक जीवनात आवश्यक असणारी कौशल्ये ही आत्मसात करण्यास बळ देतात.

गत दोन वर्षापासून करोना महामारीच्या काळात एनसीसीचे वार्षिक प्रशिक्षण बंद होते. यावर्षी प्रथमच 20 सप्टेंबर 2021 पासून 16 महाविद्यालयातील एनसीसी कॅडेटसाठी या वार्षिक शिबिराचे आयोजन कोल्हापूर ग्रुप येथे पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसी च्या वतीने केले होते. प्रशासन अधिकारी लेफ्टनंट कर्नल किशोर कुमार मोरे यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाची खबरदारी घेऊन हे शिबीर यशस्वी केले. सदरच्या शिबिरात कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजने सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचे पारितोषिक पटकाविल.

सदरच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरासाठी लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा, लेफ्टनंट प्रशांत पाटील, लेफ्टनंट स्वाती चौगुले सुभेदार मेजर एच डी शिंदे, सुभेदार प्रशांत जमनिक, सुभेदार शिवानंद नागारी, सुभेदार शेटके कार्यालयीन प्रशासकिय सेवक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी एनसीसीचे माजी विद्यार्थी डॉ रविकांत जाधव व राहूल मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले.

समारंभाचे प्रास्ताविक लेफ्टनंट कर्नल किशोर कुमार मोरे यांनी केले. तर आभार लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट अभिषेक हावळे आणि आदिती पवार यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *