लसीकरण केंद्रावर रजिस्ट्रेशन करुन लसीकरण: डॉ.कादंबरी बलकवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी):  सोमवार दि.२० सप्टेंबर २०२१ ते शुक्रवार दि.२४ सप्टेंबर २०२१ अखेर शहरातील १८ वर्षावरील नागरीकांचे लसीकरण केंद्रावर रजिस्ट्रेशन करुन लसीकरण केले जाणार असल्याची माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

 कोविशिल्डच्या डोसकरीता रोज ५०० नागरीकांना कुपन देऊन सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच भगवान महावीर दवाखाना विक्रम नगर व द्वारकानाथ कपूर दवाखाना कदमवाडी येथे लसीकरण करण्यात येणार आहे.

यावेळी प्रथम येणाऱ्या नागरीकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार असून ५००पेक्षा अधिक नागरीक लसीकरणासाठी उपस्थित राहिल्यास त्यांना कुपन देऊन दुस-या दिवशी लसीकरणास बोलविण्यात येणार आहे. नागरीकांनीलसीकरणास येताना सोबत आधार कार्ड व फोटो आयडी असलेले कोणतेही ओळखपत्र घेऊन यावे. तरी या मोहिमेत १८  वर्षावरील नागरीकांनी जास्तीत जास्त नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावेअसे आवाहनप्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *