रिलायन्स फाऊंडेशनतर्फे मोफत लसीकरण !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रिलायन्स फाऊंडेशनतर्फे गरीब व गरजू  लोकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. झोपडपट्टीत राहणारे लोक, ग्रामीण भागातील गोरगरीब, शेतकरी, मोलमजुरी करणारे लोक,स्थलांतरित कामगार आदींना अद्यापही लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे या सर्वांचा विचार करून रिलायन्स फाऊंडेशनतर्फे कोल्हापूरात अशा गरजूंना मोफत लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. रिलायन्स  फाउंडेशनतर्फे विई केअरच्या माध्यमातून ही लसीकरण मोहीम संपूर्ण देश पातळीवर राबवण्यात येत आहे.  

आतापर्यंत एकूण साडेतीनशे लोकांचे लसीकरण करण्यात आले असून राजेंद्र नगर,विचारे माळ, कनानगर,संभाजीनगर,साने गुरुजी वसाहत,सुतार माळ, कुंभार गल्ली, शाहूपुरी येथील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. कोल्हापूर शहरातील झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक,एमआयडीसी मधील स्थलांतरित कामगार, भाजीविक्रेते, रिक्षाचालक आदींचे मोफत लसीकरण करण्याचे नियोजन रिलायन्स फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.          

सर्वसामान्य,गरीब व गरजूंनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन रिलायन्स फाऊंडेशनचे राज्य व्यवस्थापक दीपक केकान , जिल्हा व्यवस्थापक मारुती खडके, कार्यक्रम सहाय्यक नवनाथ माने यांनी केले आहे.  रिलायन्स फाउंडेशनच्या या मोफत लसीकरण कार्यक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *