देशात कोरोनाचा प्रसार बराच काळ राहणार !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकार जरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवत असलं तरी भारतात कोरोनाचा प्रसार कमी होण्याच्या मार्गावर आहे. तसेच देशातील कोरोना व्हायरस कमजोर झालेला असून या आजारासह जगायला भारतीय लोक शिकलेत आहेत असं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी व्यक्त केलं आहे.

पुढे बोलताना डॉ. सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या, भारतातील कोरोना प्रसाराने आता एन्डेमिक स्थितीमध्ये प्रवेश केला असून त्यामुळे त्याचा प्रसार आता कमी किंवा मर्यादेच्या आत होत आहे.भारताने आता अशा स्थितीत प्रवेश केला आहे की ज्यामध्ये कोरोनाचा प्रसार हा कमी किंवा मर्यादेच्या आत होत आहे. काही महिन्यापूर्वी भारतात कोरोनाचा प्रादुर्भावाचा विस्फोट झाल्याचं पहायला मिळालं होतं. ती परिस्थिती आता राहिली नाही. भारतातील कोरोनाचा प्रसार हा बराच काळ राहणार असल्याचंही डॉ. स्वामिनाथन यांनी स्पष्ट केलं. 

एन्डेमिक स्थिती अशी असते की ज्यामध्ये देशातील मोठी लोकसंख्या ही त्या व्हायरस सोबत जगायला शिकते, किंवा त्यांना त्याची सवय होते. याच्या विरोधात इपिडेमिक स्थिती असते, ज्यामध्ये मोठ्या लोकसंख्येवर व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त होत असून त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *