….अखेर जिल्हा परिषदेतील शिवसेना सभापतींचे राजीनामे !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाच्या हालचाली गेल्या सहा महिन्यापासून सुरू होत्या पण शिवसेनेचे सभापती राजीनामे देण्यास टाळाटाळ करत होते.अखेर आज सेनेच्या तिन्ही सभापतींनी आपले राजीनामे संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर यांच्याकडे दिले.

शासकीय विश्रामगृहामध्ये दुधवडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस खासदार संजय मंडलिक, विजय दवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव, माजी आमदार चंद्रदीप नरके सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील आमदार प्रकाश आबिटकर तसेच अर्जुन अबिटकर उपस्थित होते. यावेळी नवीन पदाधिकारी निवडीमध्ये शिवसेनेला पुन्हा तीन जागा मिळाव्यात अशी मागणी दुधवडकर यांच्याकडे करण्यात आली.

  

जिल्हा परिषदेत शिवसेनेचे सर्वाधिक तीन पदाधिकारी आहेत.यामध्ये बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव व समाजकल्याण सभापती स्वाती सासणे हे असून या सर्वांनी आज आपले राजीनामे दिले.राजीनाम्याच्या नाट्यावर अखेर सोमवारी पडदा पडला.

पदाधिकारी बदलाच्या घडामोडीमध्ये प्रथम शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे यावेत अशी भूमिका पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली होती. त्यामुळे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सेना पदाधिकाऱ्यां राजीनामे द्यावेत असे आवाहन केले होते. आज राजीनामे देताना या सभापतींनी दुधवडकर यांना कांही अटी घालूनच आपले राजीनामे दिले आहेत. आपल्या राहिलेल्या कामांची पुर्तता झाल्या नंतररच अध्यक्ष यांचेकडे राजीनामे द्यावेत असे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *