दि.कमर्शिअल को-ऑप बँकेतर्फे महापालिकेच्या कोवीड सेंटरसाठी 17 स्टॅण्ड फॅन

कोल्हापूर प्रतिनिधी : महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी दि.कमर्शिअल को-ऑप बँक लि. कर्मचाऱ्यांच्यावतीने 17 स्टॅण्ड फॅन देण्यात आले. सदरचे साहित्य महापालिकेच्या विठठल रामजी शिंदे चौकात बँकेचे अध्यक्ष गौतम जाधव यांनी उप-आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे दिले.

महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी महापालिकेस वस्तू स्वरुपात मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन दि.कमर्शिअल को-ऑप बँक लि. कर्मचाऱ्यांच्यावतीने सदरचे साहित्य देण्यात आले. यावेळी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापरिक्षक वर्षा परिट, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, बँकेचे सीईओ अनिल नागराळे, असिस्टंट मॅनेजर पदमाकर जवळकर, असिस्टंट मॅनेजर रमेश पाटील, असिस्टंट मॅनेजर सुधीर कदम, शाख अधिकारी दत्ताजीराव साळोंखे, संताजी शिंदे, पी जे घाटगे, दिपक चव्हाण, राजेश पाटील, अर्जुन पाटील, कुणाल बोडके कपिल शेळके उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *