डेंग्यूच्या पार्श्र्वभूमीवर नागरिकहो सजग राहा :उपनगराध्यक्ष महेश कोरी

गडहिंग्लज प्रतिनिधी : गेल्या चार दिवसांपासून गडहिंग्लज शहरामध्ये काही भागांत डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत .डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सजग राहावे असे आवाहन उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी केली आहे .

संपूर्ण देश कोरोणाच्या महामारीत गेल्या दोन वर्षापासून सापडला आहे .गडहिंग्लज शहरातही अनेक जणांना कोरोणांमुळे प्राणाला मुकावे लागले आहे. त्यातच डेंग्यूची भर पडली आहे .पण नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी . घराच्या आसपास कुठेही पाण्याची डबकी साचू देऊ नयेत असे आवाहन केले आहे . गडहिंग्लज नगर परिषदेमार्फत शहरातील विविध भागात औषध फवारणी ,जनप्रबोधन करण्याचे काम सुरू आहे .गडहिंग्लज नगरपरिषद आणि आरोग्य विभाग यासाठी सतर्क असून योग्य ती खबरदारी घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले .

गेल्या चार दिवसांपासून प्लेटलेट्स आवश्यकता भासत असल्याचे समजून आल्यामुळे महेश कोरि यांनी रक्तदानाचे आवाहन केले होते या रक्तदान आव्हानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे त्यामुळे आवश्यक असलेल्या रुग्णांना प्लेटलेट्स उपलब्ध होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. नगरपरिषदेचा आरोग्य विभाग त्याचबरोबर काही होतकरू युवक तरुण मंडळी शहरातील विविध भागात जाऊन जनप्रबोधन करत आहेत त्या सर्वांची ऋण व्यक्त केले .नगराध्यक्षा स्वाती कोरी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्यासह नगरसेवक ,नगरसेविका आणि नगरपालिका प्रशासन यांच्या सहकार्याने आरोग्य विभागाचे नेटके नियोजन असल्याचे सांगितले . याकामी शहरातील गांधीनगर यूथ सर्कल, शिवाजी चौक मित्रमंडळ ,लकी ग्रुप, न्यू आझाद हेल्थ क्लब, रासाइ तरुण मंडळ, अजमद मीरा ,महेश घुगरे, मिलिंद कोरी ,पंकज भैसकर , राजू जाधव,प्रशांत कित्तूरकर, संदीप पाटील, सूरज गवळी, इम्रान मुल्ला, इम्रान चांद, सादिक लामतुरे ,आरोग्य अधिकारी शिवणे यांच्यासह नागरिक सहकार्य करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *