निरोगी शरीरासाठी योगासने हाच मोठा उपाय – चेअरमन विश्वास पाटील

कोल्‍हापूर (प्रतिनिधी ): दैनंदिन कामाच्या धावपळीत माणसाला उसंत मिळत नाही. कामाचा व्याप, पैशामागची धडपड किंवा यश, कीर्ती, अर्थप्राप्ती इत्यादी मध्ये आरोग्य रक्षण होऊनही दीर्घायुष्य हा भाग चिंतनीय आहे. सध्याच्या युगात माणूस मात्र सुखायू किंवा दीर्घायू होऊ शकलेला नाही हे सत्य आहे. त्याकरिता योग हा सध्याच्या धावपळीच्या जगात एकमेव उपाय आहे. नियमित योगामुळे शरीर निरोगी राहते. निरोगी शरीरामध्ये आनंदी मन राहते. यामुळे कार्यक्षमता वाढते. नित्य नियमाने योगासने करणे हा चांगला उपाय आहे. असे प्रतिपादन चेअरमन विश्वास पाटील यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या योग शिबिरा प्रसंगी कर्मचाऱ्याना स्वतः योगाची प्रात्यक्षिके देताना केले.


यावेळी योग विद्येतील विविध योगासनांची प्रात्यक्षिके, उदा. सर्वांगासन, पादान्गुष्टासन, शशकासन, मंडूकासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, विपरीतनौकासन, पर्वतासन, ताडासन इ.आसने चेअरमन श्री.पाटील यांनी कर्मचाऱ्यासमोर सादर करून सदरची योगासने कर्मचाऱ्याकडून करवून घेतली आणि ही आसने नित्यनियमाने गोकुळ परिवाराती सर्व घटकानी करावीत असे आवाहनही त्यांनी केले. स्वतःच्या शरीर तंदुरुस्तीचे गमक सांगताना चेअरमन श्री.पाटील यांनी आपण आपला दैनंदिन कामाचा व्याप सांभाळून दररोज ४० मिनिटे योगासने व ५० मिनिटे चालण्याचा व्यायाम करत असल्याचे सांगितले. गोकुळच्या ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील कार्यालयामध्ये संचालक व कर्मचाऱ्यासमवेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.

संचालक अजित नरके,बाळासाहेब खाडे, संभाजी पाटील(एस.आर), चेतन नरके, कार्यकारी संचालक डी.व्‍ही.घाणकेर यांनी योगाचे प्रात्‍यक्षिके करून दाखवलीत. सूत्र संचालन एम.पी.पाटील यांनी केले व आभार कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी मानले.

यावेळी चेअरमन विश्वास पाटील(आबाजी), संचालक अजित नरके, नंदकुमार ढेंगे, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील(एस.आर), प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, कार्यकारी संचालक डी.व्‍ही.घाणकेर, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, डेअरी मॅनेजर चौधरी, संघाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *