कोल्हापूरमध्ये सारथीचे उपकेंद्र : खासदार संभाजीराजे

नाशिक प्रतिनिधी : कोल्हापुरात लवकरच सारथी संस्थेचे उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे . अशी घोषणा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नाशिक येथे झालेल्या मूकमोर्चा नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केली . आणखीन राज्यात अशी ८ उपकेंद्र असतील अशीही घोषणा केली .

राज्यात ५ ठिकाणी मूकमोर्चा काढण्याची तयारी सुरु आहे त्यामध्ये मुख्य मागण्यांवर जोर दिला जाईल असे सांगतानाच मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आपण दुःखी होतॊ विचार करूनच मराठा आंदोलन सुरु केले आहे . असे म्हंटले . आता मागण्यांबाबत साकारात्मक शासनाचा प्रतिसाद मिळत आहे यासाठी २१ दिवसांची मुदत मागितली आहे . निर्णय झाला नाही तर आंदोलन तीव्र करणार असेही ते म्हणाले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *