कोरानाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे महाराष्ट्रात ७ रुग्ण….

मुंबई प्रतिनिधी : सध्या कोरोनाची दुसरी लाट हळूहळू कमी होत आहे, मागील दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे, मात्र आता अनेक तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे.

यासोबत इंग्लंड आणि युरोपात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटने सध्या थैमान घातले आहे, या व्हेरियंटमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढणार असल्याचे अनेक तज्ञांनी सांगितले आहे.याच डेल्टा प्लस व्हेरियंटने आता महाराष्ट्राची देखील चिंता वाढवली आहे, कारण महाराष्ट्रात या व्हेरियंटचे ७ नवीन रुग्ण आढळले आहे.

नवी मुंबई, रत्नागिरी आणि पालघर या ठिकाणी हे रुग्ण सापडले आहेत. यामुळे रत्नागिरीतील काही गावे देखील लॉकडाऊन करण्यात आली आहेत.या डेल्टा प्लसच्या रुग्णांनी आरोग्य व्यवस्थेची चिंता वाढवली आहे, कारण याच व्हेरियंटमुळे कोरानाची तिसरी लाट येऊ शकते असे भाकित अनेक तज्ञांनी केली आहे. यामुळे पुढील काही आठवडे महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *