यवलूज, पडळ येथे सहकारी संस्थांतील कर्मचाऱ्यांची अँटिजेन टेस्ट

यवलूज  (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने यवलूज व पडळ येथे दुकानदार, दुध संस्था वइतर सहकारी संस्थांतील कर्मचाऱ्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली .यामध्ये १०४ जणांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

गेले कित्येक दिवस पन्हाळा तालुक्यात सातत्याने कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचलत प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या यवलूज व पडळ या गावात अँटिजेन टेस्ट घेण्यात आली गावातील सर्व दुकानदार, दुकानातील कर्मचारी, सहकारी दूध संस्था कर्मचारी त्याच बरोबर इतर सहकारी संस्थेतील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.

यामध्ये १०४जणांचे नमुने घेण्यात आले ते सर्व निगेटिव्ह आले आहेत . सध्या यवलूज येथे २९ कोरोना रुग्ण तर पडळ येथे १० रुग्ण आहेत पडळ प्राथमिक  आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या १४ गावात २०१ रुग्ण आहेत. यावेळी पडळ मंडल अधिकारी अजय लुगडे, तलाठी मेघा जाधव, निवास साठे, सरपंच, उपसरपंच, ग्रा.प सदस्य, पोलिस पाटील, आरोग्य सेविका स्मिता शिंदे,  डॉ राहुल शिर्के, ग्रामविकास अधिकारी जयवंत राव चव्हाण, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *