राजमाता जिजाऊ माँसाहेब स्मृतिदिना निमित्त शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या ३४७ व्या स्मृतिदिनानिमीत्त शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने कोल्हापुरातील गंगावेश, धोत्री गल्ली येथील के एम सी

कॉलेज प्रांगणामध्ये असलेल्या जिजाऊ माँसाहेबांच्या मूर्तीस अभिवादन करण्यात आले.

 शिवशक्ती प्रतिष्ठाणच्या वतीने के एम सी कॉलेज प्रांगणामधील माँसाहेबांच्या स्मारक परिसरात स्वछता करून नंतर फुलांची सजावट करण्यात आली. राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या मूर्तीचे पूजन करून झाल्यानंतर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वानी ५ मिनिटे स्तब्धता राखून राजमाता जिजाऊ माँसाहेबाना आदरांजली वाहिली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव, कैलास दुधनकर , प्रशांत जाधव , श्रेयस कुरणे, आनंदा कांबळे, निलेश कांबळे, शेखर वडणगेकर आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *