आशा सेविका संपाला पाठिंबा देण्यासाठी शिरोळ तालुक्यात निदर्शने

इचलकरंजी (प्रतिनिधी) : आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या राज्यव्यापी संपला पाठिंबा देण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे वतीने अनेक गावांत निदर्शने करण्यात आली. शासनाने आशा कर्मचाऱ्यांच्या संपात तात्काळ हस्तक्षेप करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व त्याना किमान वेतन लागू करावे अशा मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अब्दुललाट येथे कॉम्रेड आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जयश्री पाटील, नेत्रदीप पाटील, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे देवेंद्र कांबळे,  मिलिंद कुरणे, प्रशांत आवळे ,ग्रामसेवक राहुल माळगे यांची भाषणे झाली यावेळी सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस,आशा वर्कर व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने हजर होत्या

दरम्यान घालवाड येथें कॉम्रेड सरिता कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. तसेच शेडशाल, व उमळवड व शिरटी येथे झालेल्या निदर्शनास शमा पठाण व सुनंदा कुराडे व शोभा भंडारे यांनी मार्गदर्शन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *