चंद्रकांत सूर्यवंशी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद कोल्हापूर येथे स्वर्गीय वसंतराव नाईक समिती सभागृहात कृषि समिती सभा ऑनलाईन घेण्यात आली या सभेचे औचित्यसाधून कृषि विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी हे सेवानिवृत्त झालेने शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून उपाध्यक्ष व कृषि समिती सदस्य सतिश पाटील यांच्या हस्ते सत्कार करणेत आला.

या सत्कार प्रंसगी सतिश पाटील यांनी सत्कारपर भाषणामध्ये सूर्यवंशी यांनी कार्यरत असताना बायोगॅस योजनेमध्ये सलग पाच वर्षापेक्षा जास्त राज्य व देशपातळीवरचा कोल्हापूर जिल्हा परिषदेस प्रथम क्रमांक मिळवून दिला. तसेच पिक स्पर्धेमध्ये भात व सोयाबीन राज्यात प्रथम, व्दितीय तृतीय क्रमांक कोल्हापूर जिल्हयास मिळालेले आहेत. राज्यपातळी सोयाबीन पिकस्पर्धा राबविणरा कोल्हापूर जिल्हा एकमेव असून दरवर्षी प्रथम तीन क्रमांक कोल्हापूर जिल्हयातील असतात. याचे सर्व श्रेय सूर्यवंशी यांचे आहेत. त्यांनी सर्व शेतकरी लाभार्थीना न्याय मिळेल, तसेच शेतकऱ्यांच्या योजना राबविताना लाभार्थी यादी करत असताना सर्व जिल्हा परिषद सदस्य यांना विश्वासात घेवून सर्वाना समान वाटप केलेले आहे. त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा यापुढेही शेतकऱ्यांसाठी उपयोग करावा व त्यांचे पुढील आयुष्य आरोग्यदायी दिर्घायुष जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून सत्कार प्रंसगी शुभेच्छा देणेत आल्या.

कार्यक्रम प्रंसगी जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, जीवन पाटील, अँड. हेमंत कोलेकर, मनोज फराकटे,  कल्पना चौगले, रूपाली कांबळे, मिनाक्षी पाटील, एल. के. शेख प्रभारी कृषि विकास अधिकारी यांनीही शुभेच्छा दिल्या. तसेच सदर कृषि समिती ऑनलाईन वेबपोर्टलद्वारे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, महाबीज कडील अधिकारी व सर्व तालुक्यातील कृषि अधिकारी/ विस्तार अधिकारी (कृषि ) ऑनलाईन सभेस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *