पेट्रोल-डिझेलची शंभरी, खाद्य तेल २०० पार… अब अच्छे दिन आ गये!

सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी मोदी सरकारवर टीका  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना महामारीत सामान्यांना महागाईच्या महामारीचा देखील सामना करवा लागत आहे. देशात पेट्रेल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मार्कंडेय काटजू हे सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. अनेक विषयांवर ते आपले मत व्यक्त करत असतात.

दरम्यान, मार्कंडेय काटजू यांनी वाढत्या महागाईवर मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी एक ट्वीट केले आहे. ते म्हणाले, “डिझेल आणि पेट्रोल किंमती १०० रूपयाचा वर गेल्या आहेत. सरसोचे तेल २०० रूपये, एलपीजी गॅस १००० रूपयांजवळ गेला आहे.  बेरोजगारी आणि बाल कुपोषण रेकॉर्ड मोडत आहेत, शेतकरी संकटात आहे, अर्थव्यवस्था बुडत आहे तसेच आरोग्याची देखील योग्य काळजी घेतल्या जात नाही”  केंद्र सरकारवर निशाणा साधताना मार्कंडेय काटजू यांनी पुढे लिहिले की, “अच्छे दिन आ गये!” सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या या ट्विटवर लोकं प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *